सामाजिक बांधिलकी जपणारे कधीच निवृत्त होत नाहीत ; दिपकआबा साळुंखे पाटील 

Published On:
---Advertisement---

सांगोला / तालुका प्रतिनिधी

सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी सामाजिक बांधिलकी जपणे अत्यंत गरजेचे असते. आणि आमच्या संस्थेत अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे मनोज उकळे हे यापैकीच एक होते. त्यामुळे आज त्यांची संस्थेतील प्राचार्य म्हणून सेवा पूर्ण होत असली तरी ते सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक असल्याने ते कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत असे प्रतिपादन माजी आमदार आणि विद्या विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले. 

प.पू. उदयसिंह देशमुख उर्फ भय्यू महाराज विद्यालय आणि कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य मनोज उकळे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी विस्तार अधिकारी लहू कांबळे, उद्योजक बाळासाहेब एरंडे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, गिरीश नष्टे, सचिव सुभाष लऊळकर, नंदकुमार दिघे, राम बाबर, अरविंद केदार, सचिन लोखंडे, अमर लोखंडे, आनंद घोंगडे, बापू भाकरे, रमेश जाधव, बापू ठोकळे, बाबासाहेब बनसोडे, किशोर बनसोडे, पिंटू पाटील, बाळासाहेब झपके, डॉ. धनंजय पवार सरपंच सौ डोईफोडे आदिसंह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, प्राचार्य मनोज उकळे यांनी संपूर्ण कारकीर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली त्यामुळे संस्थेचा आणि शाळांचा लौकिक वाढला. त्यांनी आपल्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. केवळ प्राचार्य आणि शिक्षक म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी शिवप्रेमी तरुण मंडळ, श्रीराम तरुण मंडळ अशा मंडळात सुरुवातीपासून सहभागी होऊन धडाडीने सामाजिक काम केले. ज्यांची सामाजिक बांधिलकी मजबूत असते असे लोक कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत. समाजसेवेची ओढ आणि आवड त्यांना कधीच शांत बसू देणार नाही असे सांगून आगामी काळात ज्या संस्थेत त्यांनी शिक्षक प्राचार्य म्हणून काम केले त्याच संस्थेत निमंत्रित संचालक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी त्यांना देणार असल्याचेही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

Follow Us On