वेळापूर/प्रतिनिधी
वेळापूर (ता. माळशिरस) येथे सुसज्ज बसस्थानकराज्य सरकारने मंजूर करावे. तसेच अकलूज आगारला नवीन बसगाड्या मिळाव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष माळशिरस तालुका यांच्यावतीने पालकमंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अकलूज आगारात ५८ बस गाड्या कार्यरत असून त्यापैकी १६ गाड्या लांबपल्ल्यासाठी सोडल्या जातात. तर काहींची अवस्था खिळखिळी झाली आहे. काही मध्यम स्वरूपाच्या स्थितीत आहेत. त्यामुळे लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या रस्त्यातच बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे अकलूज आगाराला नवीन एसटी बसगाड्या मिळाव्यात, अशा प्रकारची मागणी मिलिंद सरतापे यांनी केली आहे.अकलूज आगाराला अद्यापपर्यंत नवीन बसगाड्या मिळाल्या नाहीत. जुन्या अवस्थेत असलेल्या येथील बसगाड्या बिघाड होऊन रस्त्यातच थांबत असल्याने वेळापत्रक कोलमडते. यामुळे लांबपल्ल्याच्या प्रवाशांची, शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे अकलूज आगाराला नवीन बसगाड्या उपलब्ध झाल्यास त्या गाड्या लांबपल्ल्याच्या मार्गावर पाठवून मार्गावरील सध्याच्या चांगल्या स्थितीतील गाड्या जवळच्या ग्रामीण फेऱ्यासाठी उपलब्ध होतील. यासाठी अकलूज आगाराला तत्काळ नवीन बसगाड्या मिळाव्यात, अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची सरकारने तत्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा वेळापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसमवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी आरपीआय माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, एस. एम. गायकवाड, तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर, तालुका उपाध्यक्ष महेंद्र लोंढे आदी उपस्थित होते.वेळापूर शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत.
वेळापूर गाव हे आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर असल्याने परगावचे प्रवासी, विद्यार्थी, महिला भगिनी यांची गैरसोय होते. त्यामुळे वेळापूर येथे सर्व सोईनींयुक्त बसस्थानक झाले पाहिजे. बसस्थानक व्हावे, यासाठी यापूर्वीच्या सरकारमधील परिवहन मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. परंतु कार्यवाही झाली नाही तरी याचा गांभीयनि विचार करावा.-मिलिंद सरतापे, रिपाइं माळशिरस तालुकाध्यक्ष
