मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अध्यक्षपदी डॉ.अविनाश खांडेकर यांची निवड
सांगोला : जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अध्यक्षपदी सांगोला व माढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी डॉ. अविनाश खांडेकर यांना निवडीचे पत्र दिले.

त्यांच्या समवेत लाभ विकास प्राधिकरण सोलापूर मोजणीदार कैलास चौधरी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक कपिल गायकवाड यांची सदस्यपदी निवड केली. समन्वयकपद रिक्त ठेवले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष नियोजन भवन सोलापूर येथील तळमजल्यावर स्थापन केले आहे.