आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
चिकमहुद/प्रतिनिधी
चिकमहुद (ता.सांगोला) येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी नुकतीच भेट दिली.यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी या निवेदनामधून चिकमहूद येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार फंडातून दहा लाख रुपये निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी सांगोला पंचायत समितीचे माजी सभापती राहुलकुमार काटे, उत्तम भोसले, युवा नेते सुभाष भोसले,वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव स्वप्निल सावंत, वंचित बहुजन आघाडी तालुका प्रसिद्धीप्रमुख वैभव काटे,राहुल सरगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अपूर्वराज सरवदे,माऊली धांडोरे,रोहित सावंत, धनाजी धांडोरे, शुभम क्षीरसागर,सुरज लंकेश्वर आदी मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
