माढा लोकसभा विभागातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक टेंभुर्णी (ता. माढा) येथील वरपे फंक्शन हॉलमध्ये संपन्न झाली. या बैठकीत माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्हा समन्वयक डॉ. नितीन ढेपे तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.निवडणुकीच्या तयारीसाठी गावागावात घोंगडी बैठका आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषदांसाठी गण/गट व वार्डनिहाय कार्यकारिण्या तात्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीस माढा लोकसभा विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, विशाल नवगिरे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
