Solapur : जन आक्रोश मोर्चा साठी सांगोला तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते घेऊन जाणार – विनोद उबाळे

Published On:
---Advertisement---

सांगोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक 76 लाख मतदान वाढीच्या विरोधात सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे फायर ब्रँड नेते सुजात (दादा) आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.

तसेच यामध्ये सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळविद्याच्या संदर्भात अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र वळवता येऊ नये.यासाठी कायदा कराव अनुसूचित जाती जमातीच्या निधी संदर्भात महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी. व अनुसूचित जाती जमातीच्या न्याय हक्क अधिकारासाठी या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या जन आक्रोश मोर्चा साठी सांगोला तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते  घेऊन जाणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सांगोला तालुका अध्यक्ष विनोद (भैय्या )उबाळे यांनी सांगितले.

Follow Us On