सांगोला आगारात सहा बसगाड्या येणार
सांगोला : विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आ. शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून सांगोला बसस्थानकात शनिवारी पहिल्या टप्प्यातील ५ आधुनिक बीएस-६ श्रेणीतील बसगाड्या दाखल होणार आहेत.
शहाजीबापूर पाटील यांनी सांगोला बस स्थानकासाठी २० नव्या बसगाड्यांची मागणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीसंदर्भात शाहाजीबापूंनी स्वतः प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन, सांगोला तालुक्यातील प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी समोर मांडल्या होत्या. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने बसगाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

त्या आश्वासनानुसार पहिल्या टप्प्यातील ५ आधुनिक बीएस ६ श्रेणीतील बसगाड्या सांगोला बसस्थानकात शनिवारी दाखल होणार आहेत. या बसगाड्या अशोक लेलँड कंपनीच्या आहेत. त्यामुळेप्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायक होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांना वेळेवर बससेवा मिळणार असून, सार्वजनिक वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे.
विकासासाठी प्रयत्नशील
आमदार असो किंवा नसो, सांगोला तालुक्यासाठी मी कायम काम करत राहणार आहे. सांगोला तालुक्याचा विकास करण्यासाठी आपले कायम प्रयत्न राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी सांगोल्यात आणणार आहे.
– शहाजीबापू पाटील