सांगोला/प्रतिनिधी : सांगोला पोलिसांनी एका मोटरसायकल चोरास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५ बुलेट सह ३ मोटारसायकली अशा एकूण ८ दुचाकी जप्त केल्या आहेत.
सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागात मोटार सायकली चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या. या घटनाना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते. या अनुषंगाने सांगोला पोलीसात दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना जत तालुक्यातुन आरोपी येवून मोटार सायकल चोरी करतात अशी माहिती मिळाल्याने सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमुन सदरचे पथक जत तालुक्यात सुमारे दोन दिवस पाळत ठेवून शोध घेतला असता त्यांना गोविंद उर्फ पवन राजु काळे रा. लक्ष्मीनगर, उमराणी तांडा, जत, ता. जत, जि. सांगली यास ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगोला शहरातुन तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे व मोहोळ पोलीस ठाणे या पोलीस ठाणे हददीत मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करुन त्यांचेकडून ०५ बुलेट मोटार सायकल व ०३ इतर मोटार सायकल असे एकुण ६,२०,०००/- रुपये किंमतीच्या ०८ मोटार सायकली जप्त करण्यात आलेले आहेत.
सदर मोटार सायकलीबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे, मोहोळ पोलीस ठाणे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांचे अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरच्या ०८ मोटार सायकली पुढील तपासकामी पंचासमक्ष जप्त केल्या आहेत व पुढील तपास पो. ना. बाबासाहेब पाटील हे करीत आहेत.
सदर मोटार सायकली हस्तगत करण्याची कामगिरी श्री. अतुल कुलकर्णी साहेब, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. प्रितम यावलकर साो, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा, पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/१४२५ बाबासाहेब पाटील, पोकॉ/३३५ लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ/०५ युसूफ पठाण यांनी मदत करून सदर चोरीच्या मोटार सायकली हस्तगत केले आहेत.