सांगोला: सांगोला शहरातील फाईव्ह स्टार हॉटेल येथे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांची बैठक आयोजित केली होती यावेळी सांगोला तालुका डिजिटल मीडिया च्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रवींद्र कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

सांगोला तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांचे प्रश्न तसेच शासकीय योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम व तालुक्यातील पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम करणार असल्याचे मत नूतन तालुकाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले .
यावेळी सांगोला तालुका डिजिटल मीडिया संघटनेचे कार्यकारिणी सदस्य अमेय मस्के, सचिन भुसे, किशोर म्हमाणे, आनंद दौंडे व पत्रकार भारत कदम, सुरेश गंभीरे इत्यादी उपस्थित होते.