अचकदाणी येथे  मच्छिंद्रनाथ पालखी रिंगण सोहळ्याच्या  अश्वाचे पूजन डॉ.निकिताताई देशमुख व विद्यमान सरपंच सौ.रेश्मा मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न

Published On:
---Advertisement---

अचकदाणी येथे  मच्छिंद्रनाथ पालखी रिंगण सोहळ्याच्या  अश्वाचे पूजन डॉ.निकिताताई देशमुख व विद्यमान सरपंच सौ.रेश्मा मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न

सांगोला शौर्य न्यूज : मच्छिंद्रनाथाच्या पालखीतील अश्वाचे रिंगण गुरुवारी अचकदाणी (ता. सांगोला) येथील माळरानावर भक्तिभावात पार पडले.या अश्वाचे पूजन डॉ. निकिताताई देशमुख व अचकदाणी गावच्या विद्यमान सरपंच सौ. रेश्मा दिलीप मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या रिंगण सोहळ्यासाठी भक्तांनी गर्दी केली. यंदा सोहळ्याचे १० वे वर्ष होते.

किल्ले मच्छिंद्रगड येथील जगद्‌गुरू मच्छिंद्रनाथांच्या पालखी रथाचे बुधवार, २५ जून रोजी सकाळी ९ वाजता आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. 

यंदा दिंडीसोबत सहा हजार वारकरी सहभागी झाले. मागील आठ दिवसांत १५० किमी अंतर टाळ-मृदुंगाच्या निनादात पार करत ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करीत मच्छिंद्रनाथाची पालखी अचकदाणी शिवेवर पोहोचली. 

सरपंच सौ.रेश्मा मोरे,उपसरपंच शिवाजी चव्हाणे, वसंत चव्हाण, नंदकुमार गंभीरे, आण्णासाहेब पुजारी, ग्रामपंचायत अधिकारी सुषमा मोरे, महसूल अधिकारी नेहा राऊत, शामराव खरात यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, डॉ. निकिता देशमुख, डॉ. पीयूष साळुंखे-पाटील, माजी सभापती बाळासाहेब काटकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

Follow Us On