Chikmahud:चिकमहूद येथील आबासो तांबवे यांना पीएच.डी पदवी प्रदान 

Published On:
---Advertisement---

चिकमहुद/ प्रतिनिधी चिकमहुद (ता.सांगोला) येथील आबासो जगन्नाथ तांबवे यांनी नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. शशिकांत लक्ष्मण तांबे प्राचार्य बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चळे, ता. पंढरपूर यांच्या मार्गदर्शनात रायगड जिल्ह्यातील माध्यमिक स्तरावरील आदिवासी विद्यार्थांना येणाऱ्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास हे संशोधन कार्य पूर्ण केले आहे. या संशोधन कार्यासाठी त्यांना शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. 

त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन  सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दामा सर, प्रा.डॉ.हिरेमठ सर, प्रा.डॉ.कांबळे सर,प्रा.डॉ. शिंदे सर, मार्गदर्शक प्राचार्य डॉ.एस. एल.तांबे सर यांच्याकडून करण्यात आले.यावेळी सौ. प्रियांका तांबवे, श्री. जगन्नाथ तांबवे,विठ्ठल तांबवे, अनिल तांबवे, सुनील तांबवे,नामदेव तांबवे,संभाजी तांबवे,बाळासाहेब तांबवे, शिवाजी तांबवे,आण्णासो तांबवे, सुरेश तांबवे, नेताजी तांबवे,सुरेश सूळ महाराज, प्रभाकर सातपुते,अनिल बंडगर, बाळदादा बंडगर,संतोष दुधाळ, उमेश राजपुत राजकुमार पवार, सत्यवान कारंडे,मल्हारी हेगडे, अमोल रुपनर, विठ्ठल बंडगर,सुभाष गोफणे शहाजी गोफणे, पांडुरंग गोफणे,सचिन गोफणे,अभिमान गोफणे, प्रथमेश गोफणे, झी टॉकीज फेम प्रकाश महाराज साठे हे ही उपस्थित होते.

तसेच त्यांनी मिळवलेल्या पीएचडी या पदवीमुळे त्यांचे चिकमहुद परिसरातील नागरिकांमधून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Follow Us On