BJP:उमाजी चव्हाण यांचा उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश

Published On:
---Advertisement---

दिघंची (ता. आटपाडी) : दीर्घकाळ सामाजिक कार्यात सक्रिय असलेले तरुण व जिद्दी कार्यकर्ते उमाजी चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून, हा प्रवेश रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी त्यांच्या राजेवाडी येथे आयोजित सोहळ्यात होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

उमाजी चव्हाण हे राष्ट्रीय समाज पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असून, अनेक वर्षे त्यांनी ग्रामीण व शहरी भागात पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य केले आहे. माधवराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाज पक्ष माध्यमातून त्यांनी समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने संघर्ष केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षातून राजीनामा देत असल्याचे पत्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले होते.

पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उमाजी चव्हाण यांनी भावना व्यक्त करताना सांगितले,सामाजिक कार्यातून उभे राहिलेले उमाजी चव्हाण यांनी अनेक वर्षे गावातील व तालुक्यातील विविध समस्या हाताळल्या आहेत. त्यांचा संघर्ष आणि लोकांशी असलेला थेट संपर्क हीच त्यांची खरी ओळख आहे.

या पक्षप्रवेशामुळे आटपाडी तालुक्यातील भाजपला नवे बळ मिळेल, असा विश्वास स्थानिक पातळीवर व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Follow Us On