सोलापूर – वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तसेच होलार समाज अध्यक्ष तुकाराम पारसे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने पारसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच, वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या कुटुंबाला आधार दिला.डॉ. नितीन ढेपे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी) यांनी तुकाराम पारसे यांच्या मुलासाठी सोलार कंपनी, सोलापूर येथे राहण्याची, आणि नोकरीची व्यवस्था केली असून लवकरच त्याच्या कामाचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

याचप्रमाणे, पारसे यांच्या मुलीचा L.L.B. (CET) चा निकाल लागलाय तिच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारीही वंचित बहुजन आघाडी सोलापूरने उचलण्याचे ठरवले आहे.या पार्श्वभूमीवर पारसे कुटुंबाने डॉ. नितीन ढेपे यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महासचिव विनोद इंगळे, विक्रांत गायकवाड, अनिरुद्ध वाघमारे, शाहीद शेख, रवी थोरात आणि आनंद वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.