सांगोला :येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलास डोंगरे यांची तर व्हाईस चेअरमन पदी गोविंद भोसले यांचे निवड करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षकांना अल्प दराने पतपुरवठा करणाऱ्या सांगोला येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी विलास डोंगरे यांची तर व्हाईस चेअरमन पदी गोविंद भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी या दोघांचेच अर्ज आल्यामुळे अध्यासी अधिकारी अमर गोसावी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर दोघांचेही सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले.याप्रसंगी मावळते चेअरमन माणिक मराठे यांचेसह अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संचालक तानाजी साळे,वसंत बंडगर,संजय गायकवाड,कमल खबाले, पल्लवी मेणकर,तज्ञ संचालक कैलास मडके,सचिव अमर कुलकर्णी,प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी,तानाजी खबाले, विकास साळुंखे,तालुकाध्यक्ष मोहन अवताडे,संजय काशीद,संतोष निंबाळकर, विश्वंभर लवटे,मनोहर काशीद,उमेश महाजन,नवनाथ साळुंखे,पंकज मसगौडे,संजय सरगर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना नूतन चेअरमन विलास डोंगरे व व्हाईस चेअरमन गोविंद भोसले यांनी संस्थेचा कारभार सर्व सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शक केला जाईल असे सांगितले.