महूद परिसरामध्ये गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे पेव माजले ;महूद बिटला उपस्थित राहणाऱ्या खमक्या अधिकाऱ्याची गरज
सांगोला : महूद व महूद परिसरातील लगतच्या काही गावांमधील वाढती गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देणारी ठरते आहे. छोट्या मोठ्या गोष्टींवरून जीवे मारणे, मारामारी करणे, म्हणजे शुल्लक बाब झालेली दिसून येते. त्यात तुल्यबळ पोलीस व सणवार व इतर ड्युट्यांमधे तेही भरडले जात असल्याचे चित्र दिसून येते. महूद व महूद परिसरामध्ये गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे पेव माजलेले दिसून येत आहे. म्हणजेच तरुणाई कुठे भरकटत चालली आहे हे अभ्यासणे गरजेचे बनले आहे.महूद बीटमध्ये पोलीस हे पूर्णपणे वास्तव्यात दिसत नाहीत.
वाढती व्यसनाधीनता बनतेय गुन्हेगारीचे कारण-
अल्पवयीन वयापासून गुटखा, सिगारेट,मद्यपान तर कमी पैशात व कुठेही उपलब्ध होणारे दारू, टॅगो यांचे व्यसन परिसरातील ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात दिसून येतो. व यातून छोटी मोठी गुन्हेगारी जी वाढती आहे ती निश्चित च पोलिसांची डोके दुखी वाढवणारी ठरू पाहत आहे.

वाढते अवैध धंदे व वाढती गुन्हेगारी –
महुद परिसरातील चिकमहुद, कटफळ, अचकदानी, इटकी,खवासपूर,लोटेवाडी, महिम, यासह परिसरातील लगतच्या गावांमध्ये अवैध धंद्याचा वाढता सुळसुळाट हा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू पहात आहे. या सर्व वाढत्या अवैध धंद्यांकडे आर्थिक देवाण घेवाणाने हेतुपूर्वक डोळेझाक केली जाते असे नागरिकांचे म्हणणे आहे. व यातूनच गुन्हेगारीला चालना मिळते आहे. व कमी वयातले तरुण गुन्हेगारीकडे आकर्षिले जात असल्याचे काहीसे चित्र आहे.
पोलिसांना आव्हान
महुद परिसरातील चिकमहुद, कटफळ, अचकदानी, इटकी,खवासपूर,लोटेवाडी, महिम, यासह आदी भागात किरकोळ वादातून, जुन्या भांडणातून मारामाऱ्या, प्राण घातक हल्ले हे अधून सुरूच असतात आणि ही वाढती गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. तसेच महूद व परिसरामध्ये यापूर्वी अनेक मोठ्या चोऱ्या झाल्या या चोऱ्यांचाही उलगडा पोलिसांना होऊ शकला नाही. अशा टोळ्याचे पोलिसांना आव्हान ठरू पहात आहे.
पी आय साहेब चांगलेच मात्र महूद बिट अंमलदाराने वेशीवर टांगले :- ॲड.अभिषेक कांबळे.
सांगोला पोलीस ठाण्यात पदभार स्विकारताच तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणारे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची ओळख आहे. श्री.घुगे यांच्या कामाची पद्धत पाहता सांगोला तालुक्यात जनमाणसांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत मोठी विश्वासार्हता निर्माण होत आहेच, मात्र तालुक्यातील सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या महूद बीट अंतर्गत हद्दीमध्ये वारंवार गंभीर गुन्हे घडत असुन बिट अंमलदार यांच्या अनुपस्थिती व निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. त्यामुळे महूद बिटला उपस्थित राहणाऱ्या खमक्या अधिकाऱ्याची गरज असून याबाबत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी लक्ष घालावे.
-ॲड.अभिषेक कांबळे,तालुकाध्यक्ष,काँग्रेस पार्टी.