TET Exam 2025 | सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवण्याची वेळ

Published On:
---Advertisement---

टेट परीक्षेची स्थिती : सिस्टीम बंद पडल्याने झाला परिणाम

सोलापूर : राज्यात सध्या टेट (शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी) परीक्षा सुरू आहे. अनेक ठिकाणी अचानक सिस्टीम बंद पडल्याने बऱ्याच भावी शिक्षकांना सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवावे लागले आहेत.

राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पदासाठी आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून टेट परीक्षा घेण्यात येत आहे. राज्यातील अनेक ऑनलाइन परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात तब्बल तीनवेळा सिस्टीमच बंद पडली. सिस्टीम सुरू झाल्यानंतर परीक्षार्थिनी सोडविलेले प्रश्न पुन्हा सोडवावे लागले. त्यामुळे त्यांचा बराचवेळ गेल्याची तक्रार परीक्षार्थिनी केली.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टेट परीक्षा 24 मे पासून घेण्यात येत आहे. पाच जूनपर्यंत ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील अनेक डिजिटल परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात असलेल्या उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तांत्रिक अडचणींमुळे हजारो भावी शिक्षकांना पेपर पूर्ण सोडविता आला नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विवाहित प्रमाणपत्र नसल्याने परीक्षेपासून वंचित

परीक्षेसाठी आलेल्या अनेक विवाहितांची माहेर आणि सासरची आडनावे आधारकार्डवर वेगळी लागलेली होती. त्या महिलांनी लग्नाचा पुरावा असलेले विवाह प्रमाणपत्र सोबत आणले नव्हते. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेशाची मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

Follow Us On