Chandrashekhar Bawankule | वाळू चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा 

Published On:
---Advertisement---

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश

सोलापूर: गौण खनिज अंतर्गत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दंड व फौजदारी कारवाई एकत्रितपणे केली पाहिजे. तरच वाळू चोरांवर वचक बसेल. दंड वसूल करणे. ऐवजी फौजदारी कारवाई करून उत्खनन चुकीच्या पद्धतीने होणार नाही.याची काळजी घ्यावी.प्रशासनाने 413 लोकांवर जी दंडात्मक कारवाई केली आहे.त्याऐवजी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ,असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. 

नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीवेळी बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निर्हली, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, दिनेश पारगे यांच्यासह उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. 

तहसीलदार, प्रांताधिकार्‍यांनी अर्थन्यायिक प्रकरणे त्वरित निकाली काढावीत. जास्तीत जास्त दोन तारखा देऊन प्रकरणे मेरिटवर निकाली निघतील यासाठी प्रयत्न करावेत. तसेच महसूल विभागातील अधिनियम कायदे आजच्या काळानुसार नसतील व त्यात काही ठिकाणी बदल आवश्यक असतील तर तसे अभ्यास पूर्ण बदल करण्याचे प्रस्ताव महसूल विभागाला द्यावेत. त्यात बदल करण्याबाबत सकारात्मक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी यावेळी नमूद केले. 

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कामकाजाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये गौण खनिज वसुली 97 कोटी झाल्याचे सांगून नवीन शासन निर्णय याप्रमाणे नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यात नऊ वाळू गटाची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी बावनकुळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्राथमिक स्वरूपात पाच घरकुल लाभार्थ्यांना नवीन वाळू धोरणानुसार मोफत वाळू घेऊन जाण्यासाठी रॉयल्टी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Follow Us On