सांगोला : स्व.आमदार आबासाहेबांनी अकरा वेळा सांगोला विधानसभेचे नेतृत्व केले.त्यातील बहुतांश काळ ते विरोधी पक्षात राहुनच त्यांनी काम केलेले आहे.निवडणुक झाली की राजकारण संपले व नंतर जनतेच्या विकासाठी ते सरकार दरबारी अनेक प्रश्न उपस्थित करुन अनेक कामे मार्गी लावत असत.आबासाहेबांचे सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.
आज सुध्दा नुतन आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अवघ्या काही दिवसांतच सरकारमधील मंत्र्याशी तसेच सर्व राजकीय पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करुन आहेत.त्यामुळे निवडणुक झाली की,जनतेचा विकास महत्वाचा असतो.विकास साधण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांशी सतत भेटत असतात. त्यामुळे सरकारमधील मंत्री महोदय सुध्दा चांगला प्रतिसाद देत आहेत. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची अनेक कामे मार्गी लागत आहेत.

शेतकरी कामगार पक्ष हा उठ-सुट राजकारण करीत बसत नाही. व ती शेकापची पध्दत ही नाही. आबासाहेबांनी जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सरकार पक्षातील व विरोधी पक्षातील सर्व नेत्यांशी चांगले संबंध ठेऊन होते. हेच संबंध आंम्ही त्याचे राजकारण न करता खरे ते जनतेपर्यंत पोहचवतो.स्व.आबासाहेबांनी टेंभु योजनेसाठी केलेल्या प्रयत्नांची कबुली भाजपचे केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तसेच इतर पक्षांतील वरीष्ठ नेत्यांनी जाहीरपणे दिली आहे .त्याचीच जाहीरात त्याचीच पत्रकबाजी आजही आम्ही करीत आहोत.कारण ती वस्तुस्थिती आहे.
तसेच लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी नुकतेच पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटुन माण नदीमध्ये टेंभुचे पाणी सोडण्याची रीतसर मागणी केली होती. विशेषता पाणी देण्यास उशीर झाला आहे. ही बाब आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी पाटबंधारे मंत्राच्या लक्षात आणुन दिल्यानंतर मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती केली. व तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. ही खरी4वस्तुस्थिती आहे. या घटनेची आम्ही जाहिरात बाजी व पत्रक बाजी शेतकरी कामगार पक्ष करत आहे.
मुख्यमंत्री महोदयांना आमदार बाबासाहेब देशमुख हे विकास कामानिमित्त भेट घेऊन मतदार संघातील अडचणी सांगत असतात ते ही चांगला प्रतिसाद देत असतात याचीच जाहीरात-पत्रकबाजी आंम्ही करतोय. डाॅ .बाबासाहेब देशमुख हे जनतेने निवडुन दिलेले आमदार आहेत.जनतेचे प्रतिनिधी आहेत. म्हणुन सरकारमधील मंत्री महोदय त्यांचे ऐकून घेऊन मार्ग काढतात.त्यामुळे केलेल्या कामाची जाहीरात व पत्रकबाजी शेतकरी कामगार पक्ष करीत राहणार व करणार असे मत शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी साप्ताहिक सांगोला शौर्य शी बोलताना व्यक्त केले.