महामंडळ वाटप लवकरात लवकर करा !

Published On:
---Advertisement---

शाहांची भेट घेत अजित पवारांनी केली चर्चा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याच्या दृष्टीने महामंडळांचे वाटप ॥ लवकरात लवकर केले जावे, या करता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सोमवारी रात्री भेट घेतली. या भेटीत महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे समजते.

सह्याद्री अतिथीगृहात अमित शाह आणि अजित पवार यांची 5 ही भेट झाली. नव्या महायुती सरकारची स्थापना होऊन पाच महिने उलटल्यानंतरही त्यांच्यात महामंडळांचे वाटप झालेले नाही. लवकरच स्थानिक स्वराज्य 15 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या आगोदर हे वाटप केले जावे, * अशी मागणी महायुतीतील घटक पक्षांकडून होत आहे. मात्र, त्यांच्यात या वाटपाचा फॉर्म्युलाच नक्की होऊ शकलेला नाही. भाजपकडून ५० टक्के महामंडळाच्या अध्यक्षपदावर दावा केला जात आहे.

शिवसेना ३० टक्के, तर राष्ट्रवादी ३० ते २५ टक्के वाटा मागत आहे. ‘ शिवसेनेला राष्ट्रवादीचा दावा आयोग्य वाटत आहे. त्यांच्यापेक्षा आमचे खासदार व आमदार जास्त असल्याने त्याप्रमाणातच महामंडळे मिळावीत, अशी शिवसेनेची मागणी आहे. यामुळे सर्व गोंधळात महायुतीचे महामंडळ वाटप रखडले आहे. आता महामंडळांच्या वाटपाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्याच दृष्टीने महामंडळांतील आपल्या पक्षाचा वाटा निश्चित करण्यासाठी पवार यांनी शाह यांची भेट घेतल्याचे समजते. आता तिन्ही पक्षांत अंतिम चर्चा होऊन येत्या आठवडाभरात महायुतीचे महामंडळ वाटप पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us On