केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची महायुतीवर नाराजी?

Published On:
---Advertisement---

शरद पवारांचे केले कौतुक

सांगली: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नुकताच सांगली दौरा होता.सांगलीत पत्रकार परिषदेत आठवले यांनी महायुतीवर थेट नाराजी व्यक्त करतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे मात्र मन भरून कौतुक केले. आठवले म्हणाले की, माझ्या पक्षाचा एकही आमदार खासदार नाही.तरीही माझ्या पक्षाचीजी छोटी मोठी ताकद आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहित आहे. त्यामुळेच मला तीन वेळा मंत्रिमंडळात घेतले असेही ते म्हणाले. 

रामदास आठवले म्हणाले की, आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही. दिल्लीत आणि महाराष्ट्रातही पद मिळत नाहीत.राज्यात एक मंत्रीपद अथवा महामंडळ मिळायला हवे होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेसाठी एक ही जागा दिलेली नाही. आमच्यावर अन्याय होतोय, ही खरी गोष्ट आहे. सत्तेचा वाटा आम्हाला मिळायला हवा होता. शरद पवार यांच्या काळात काँग्रेस आघाडी बरोबर असताना सहा ते सात जणांना विधानपरिषदेवर संधी मिळाली होती व मंत्री देखील झाले होते. 

आघाडीच्या काळात आम्हाला अनेक ठिकाणी सत्ता मिळाली.पण महायुतीच्या काळात आरपीआयला ला सत्तेत संधी मिळत नाही.याबद्दल माझे कार्यकर्ते खूपच नाराज आहेत असे हे रामदास आठवले म्हणाले.

आंबेडकरांनी रिपब्लिकन चे नेतृत्व करावे. 

रामदास आठवले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष सुरू झाला आहे. रिपब्लिकन पक्षांमध्ये विविध गट आहेत. या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व गटांनी एकत्र यावे आणि त्याचे नेतृत्व ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी करावे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. यासाठी मंत्री पद सोडावे लागले तरी चालेल. कारण समाजापेक्षा पद मोठे नाही.असे बोलताना रामदास आठवले म्हणाले.

Follow Us On