कष्टाने हाल होतात! हार होत नाही !!!
“रावश्या ते गोरवे सर” संघर्षमय १४ वर्ष प्रवासाची यशोगाथा…!
माझा जिवलग मित्र रावसाहेब शंकर गोरवे गाव लिंगीवरे (ता.आटपाडी) रावशा या नावाने गल्लीत आणि गावात ओळखतात.रावसाहेब माझ्या दोन वर्ष पुढे होता.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगीवरचे शिक्षण घेऊन तो श्री.धुळाजीराव झिम्बल विद्यालय लिंगीवरे येथे गेला.मी पाचवी आणि तो आठवी वी ला होता.अतिशय गरीब परिस्थिती वडील पूर्ण व्यसनाधीन,आईचे जीवावर पूर्ण संसार आणि त्यात दोन बहिणी आणि एक लहान भाऊ आणि रावसाहेब थोरला.जमीन नाही, उदरनिर्वाच पूर्ण साधन म्हणजे आईची मजुरी.
इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि रावसाहेब नापास झाला.मग वडिलांनी रागाने दारू पिऊन शिव्या द्यायला चालू केल्या.दहावीतच अपयश आल्याने त्याच्या पदरी निराशा पडली.वडिलांचा संसारासाठी हातभार होताच.सनई वादन करून आईच्या हाताला ते मदत करत होते. पण व्यसनाधीनता आणि घरातील दहावीतच पाया व थोरला आपण नापास झाल्याचे दुःख त्याच्या पदरी आले आले.
खचतो तो “रावसाहेब कुठला”, गावातील अतिशय फास्टर बॉलर म्हणून त्याची ओळख.क्रिकेट खेळत,गवंड्याच्या हाताखाली कामाला जाऊ लागला.मजुरीची कामे,खत भरणे,दगड उचलणे, इत्यादी कामे रावसाहेब करू लागला.व राहिलेल्या विषयाचा अभ्यास करू लागला.पहिल्या प्रयत्नात राहिलेला दहावीचा विषय सोडून रावसाहेब उत्तीर्ण झाला.नंतर तो सकाळी लवकर सायकलवर इयत्ता अकरावीसाठी एकता मोरे पाटील माध्यमिक व विद्यालय व जुनिअर कॉलेज जाऊ लागला. आर्ट्स विभागामध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले.तो जात होता.
त्यावेळी कॉलेज ही नवीन आणि तोही त्यात नवीन आणि अतिशय शांत, सर्व शिक्षकांची मने जपत, कष्ट करत रावशा बारावी उत्तीर्ण झाला.मी बारावी विज्ञान ने के.बी.पी. कॉलेज देवापुर तालुका मान जिल्हा सातारा येथून तर श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी येथे बीएससी ला ऍडमिशन घेतले होते. प्रथम मेरिट लिस्ट नुसार मला २७ऑगस्ट २०१० रोजी प्रवेश मिळाला.तो म्हणजे कै.एकनाथराव मोरे पाटील अध्यापक विद्यालय दिघंची येथे पहिल्या यादीत रावसाहेबला डीएडला ऍडमिशन मिळाले नाही.पण दुसऱ्या यादीत रावसाहेब ला ऍडमिशन मिळाले.
तिथेच रावसाहेब आणि माझी वर्गमित्र म्हणून नवीन ओळख झाली.रोज गल्लीतच असणारा परंतु अतिशय शांत, मोजकेच बोलणारा, एक क्रिकेटचा प्रज्वल खेळाडू परंतु डी.एड. ला प्रवेश घेतल्याने रोज बोलणं होऊ लागलं. व स्वभाव जाणवू लागला.अतिशय साधा परंतु व मनाने अतिशय खंबीर असणारा मोठमोठे संकटे पेलणारा, प्राचार्यशी सुद्धा चुकीच्या गोष्टी वाद घालणारा रावसाहेब माझ्याबरोबर डीएड पास झाला. नंतर २०१० ला शिक्षक भरती बंदी आली होती. नोव्हे २०१२ अखेर शिक्षण शिक्षण पूर्ण करून व जॉब संदर्भात टायपिंग करून अनेक एक-दोन परीक्षा दिल्या. परंतु हाती काही लागले नाही.हाताला काम नाही.म्हणून रावसाहेब ने सांगली त स्थलांतर केले. सांगली त्याला मीच घेऊन गेलो. मी माघारी आलो.परंतु रावसाहेब ने माघारी घेतली नाही.
नंतर त्याने एल.एल.बी प्रवेश घेतला. काही दिवस जॉब जॉब करत तो अनेक अडथळ्यांची शर्यत तब्बल १४ वर्षे तो बघत होता. गावाला आलं की प्रत्येक वेळी आई वडिलांना काय सांगायचं म्हणून तो सांगलीतून येतच नसे. कधी कधी माझाही त्याचा फोन होत असे. दोन वेळा एमपीएससीने हुलकावणी दिली होती. दोन सरळ सेवा परीक्षेत आसपास गेला तिथेही अपयश आणि हुलकावणी मिळाली. घरच्यांचा प्रत्येक वर्षी लग्नासाठी दबाव वाढत होता. रावसाहेब वय वाढत होतं, खोली, मेस,आणि सांगलीतील जीवन, घरची परिस्थिती या यातून त्याला मार्ग सुचत नव्हता. पैशाची खूप ओढाताण होत आहे असे दिसल्यावर. काही दिवस त्याने पूर्ण अभ्यास सोडून दिला.
त्यावेळी जिवलग मित्र अनिकेत कुरणे यांनी त्याला रिलायन्स मध्ये इन्शुरन्स च काम बघितलं एमपीएससीचा अभ्यास पुन्हा काही दिवसांनी सुरु केला. एवढ्या १४ वर्षात रावसाहेब खचलेला आणि कोणाकडे हात पसरलेला मी बघितला नाही.या वर्ष भरात त्याची आवडती शिंगणापूर यात्रा त्याने बुडवली, कोणाच्याही लग्नाला जात नव्हता.वकिली क्षेत्रात करिअर घडवायचं म्हणून वकिलीचे शेवटच्या वर्षाचे शेवटचे सेमीस्टर दिले आणि याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले.
परंतू २०२२ साली दिलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा दुसऱ्या फेज मधील काल रात्री अचानक निकाल लागला.मी त्याला फोन केला अरे रावसाहेब सेकंड पेज चा निकाल लागला आहे बघितला नाही का?तो नाही म्हणाला त्याने मला आयडी पासवर्ड दिला.व बघायला सांगितले. मला विश्वास बसत नव्हता. की केवळ महाराष्ट्रातून अनु. जाती साठी १८५ जागा होत्या. दोन लाख आसपास मुले बसली होती. रावसाहेब च नाव मला दिसलं. नगरपरिषद जयसिंगपूर जिल्हा परिषद असे नाव दिसतात “गोरख्या काम झालं, तेही एक रुपया न देता.”.म्हणून जोराने ओरडलो तो ही मोठ्याने खुश झाला .
आमच्या डीएडच्या वर्गात व गल्लीत ठराविक जन लाडाने “गोरख्या ” या नावाने हाक मारतात .भरमसाठ पैसा घेऊन संस्थापक डीएड धारक आणि बी.एड.धारक यांना राबवून घेतात. त्याचं कर्ज मरेपर्यंत फिटत नाही. रावसाहेब ला जयसिंगपूर नगर परिषदेचे जिल्हा परिषदेचे शाळा मिळाली. हे रात्री अकरा वाजता त्याला व त्याचा लहान भाऊ इंजिनियर समाधान गोरवे याला सांगताना माझे मन भरून येत होते. त्याने अनेक वर्ष घेतलेला संघर्ष, गरीबीतून आलेली त्याची स्तिथी, आई वडील,भाऊ, बहीण मित्र, गाव नातेवाईक यांची झालेली अस्वस्थता मी जवळून पाहिले होती.
थोडक्यात कष्टाने हाल होतात.हार होत नाही.हे रावसाहेब ने सर्वांना दाखवून दिले.त्याच्या आयुष्यात या १४ वर्षात खूप मोठ्या घटना घडून गेल्या सर्व घटना सांगू शकत नाही.परंतु त्याच्या जिद्दीला आणि संयमाला माझा मित्र म्हणून सलाम आमच्या डी.एड. बॅच चा कै.एकनाथराव मोरे पाटील अध्यापक विद्यालयाचा पवित्र पोर्टल मार्फत निवड होणारा *तो एकमेव विद्यार्थी आहे.त्यामुळे या स्पर्धेच्या युगात शिक्षक होणे हे एक दिवस स्वप्न झाल आहे. पण हे स्वप्न रावसाहेब न सत्यात उतरवलं याचा मला सार्थ अभिमान आहे.भविष्यातील वाटचालीस खूप मनःपूर्वक शुभेच्छा…अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना…
– तुझाच एक वर्ग मित्र
अमोल के. जावीर (MA Eco, Mlib&ISc, D.T. Ed, PGDCA, D.T.ED)