कु.जान्हवी कारंडे ८१.६० टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये चिकमहुद (ता.सांगोला) येथील मा.सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालय चिकमहुद विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९७.६८ टक्के इतका लागला आहे. या निकालामध्ये मुलींनीच उत्तुंग भरारी मारली आहे.
विद्यालयातील एकूण 44 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मा.सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयात कु.जान्हवी सचिन कारंडे ८१.६०% गुण प्राप्त करून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.तर द्वितिय क्रमांक कु.सुहानी राजेंद्र शिरतोडे – ८०.६०%,तृतीय क्रमांक कु.सानिका औदुंबर भोसले – ७९.८०% व चतुर्थ क्रमांक कु.अंकिता अमोल कदम – ७९.४०% यांनी मिळवला आहे.
मा.सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सागर पाटील,मुख्याध्यापक दशरथ दिघे सर, व शिक्षक, शिकेत्तर कर्मचारी, व पालक यांचेकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.