SANGOLA :ॲड. अभिषेक कांबळे शेतकऱ्यांच्या बांधावर; अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

Updated On:
---Advertisement---

शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी केली मागणी

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे सांगोला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाची झालेली नुकसानीची पाहणी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष ॲड. अभिषेक कांबळे यांनी केली यावेळी नुकसानग्रस्त शेतकन्यांशी संवाद साधताना कांबळे म्हणाले की गेल्या दोन तीन दिवसांपासून सांगोला तालुक्यामध्ये अवकाळी पा वत्साने थैमान पातले आहे तालुक्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाच्या या अस्मानी संकटामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल होऊन पुरता अडचणीत आला आहे त्यामुळे शासनाने नियम व अटीं जाचक न करता तालुक्यातील ज्या ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष ॲड. अभिषेक कांबळे यांनी केली आहे

सांगोला तालुका हा परंपरागत दुष्काळी तालुका असून काही राजकारणी मंडळींकडून तालुक्यात पाणी आल्याचे कागदोपत्री भासवले जात असले तरी तालुक्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची देखील समस्या आहे अशा विधानात परिस्थितीमध्ये देखील आसमानी संकटात देखील न डगमगता तालुक्यातील शेतकरी बांधव ताट मानेने उभा राहून शेती करत आहे.

त्यामुळे अचानक पणे आलेल्या अवकाळी पावसात आपल्या लेकराप्रमाने जतन केलेल्या पिकांचे व फळबागांचे नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना म दत करून तात्काळ दिलासादेण्याची गरज असल्याचे मत यावेळी ॲड.अभिषेक कांबळे यांनी व्यक्त केले.

Follow Us On