महूद, ता. ८ : महूद अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी-केसकरवस्ती या शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.या शाळेचा इयत्ता दुसरीतील दक्ष घाडगे हा या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आला आहे.
राज्यस्तरीय बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी-केसकरवस्ती शाळेचा दक्ष सोमनाथ घाडगे हा जिल्ह्यात प्रथम आला आहे.तर इयत्ता तिसरी मधील प्रणव नागणे या विद्यार्थ्याने केंद्रात सातवा क्रमांक पटकाविला आहे.तर इयत्ता तिसरी मधीलच माऊली सावंत याने केंद्रात आठवा क्रमांक पटकाविला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना उमेश महाजन,धुळा सातपुते,वंदना पाटणे,विठ्ठल तांबवे यांचे मार्गदर्शन लाभले.चव्हाणवाडी-केसकरवस्ती शाळेच्या या यशाबद्दल दक्ष घाडगे, प्रणव नागणे, माऊली सावंत या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती,पालक,केंद्रप्रमुख दिलीप ढेरे, शिक्षणविस्ताराधिकारी लहू कांबळे, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले आदींनी अभिनंदन केले आहे.