मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अध्यक्षपदी डॉ. अविनाश खांडेकर यांची निवड
सांगोला/प्रतिनिधी
वैद्यकीय उपचाराकरिता नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामधून सहजपणे अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे,याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याच्या अध्यक्षपदी सांगोला तालुक्याचे आरोग्य अधिकाएरी डॉ. अविनाश खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांचेकडील पत्रान्वये मुख्यमंत्री सचिवालयाने याबाबत परिपत्रक काढले होते.नागरिकांना वैद्यकीय उपचाराकरिता अर्थसहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावे,मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध व्हावी यामुळे नागरिकांच्या वेळेचा व पैशाचा अपव्य टाळता यावा यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या अध्यक्षपदी सांगोला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नियुक्ती केली आहे. या सहायता निधी कक्षामध्ये इतर तीन सदस्यांचा समावेश आहे.मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या अध्यक्षपदी डॉ.खांडेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
