सांगोला पोलीस ठाणे येथे नूतन पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गेल्या काही दिवसापासून तालुक्यामध्ये अवैद्य धंदे चालकांवरती कारवाईचा बडगा उभारलेला दिसत आहे.परंतु नवीन पोलीस निरीक्षक तालुक्यात आले की ?काही दिवस छोट्या-मोठ्या कारवाया केल्या जातात? हे सांगोलकरांना चांगलेच माहित आहे.तरी नूतन पोलीस निरीक्षक यांनी सांगोला तालुक्यामध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी,तालुक्यामध्ये असणारे अवैध धंदे बंद करून मोठया अवैध धंदे चालकांवरती कारवाईचा भडका उभारावा व एक आदर्श प्रशासकाचे कामकाज कसे असते ते जनतेला दाखवून द्यावे.असे मत वंचित बहुजन आघाडीचे सांगोला तालुका अध्यक्ष विनोद उबाळे यांनी बोलताना व्यक्त केले.
सांगोला तालुक्याचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पदभार घेतल्यानंतर किरकोळ कारवाईचा बडगा सुरु ठेवला आहे की ? कायमस्वरूपी गुन्हेगारी संपविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत? असा प्रश्नही ही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.यामध्ये चौका-चौकात थांबून टू व्हीलर पार्किंग, ट्रिपल सीट, लायसन्स, इन्शुरन्स ,पीयूसी अशा गाड्यांवरती कारवाई करायला सुरुवात केली आहे. हे काम कौतुकास्पद आहे. परंतु सांगोला शहर व ग्रामीण भागातील अवैध व्यवसाय करणाऱ्या मोठमोठ्या अवैध धंदे चालकांवरील कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारे अवैध धंदे त्यामध्ये दारू विक्री,वाळू, जुगार ,मटका,गुटखा , गुंडगिरी, शालेय किंवा कॉलेज परिसरात महिला व मुलींना होणाऱ्या त्रासापासून रोखणे हे खरे नूतन पोलीस निरीक्षकांच्या च्या पुढचे मोठे आव्हान आहे.
पोलिसांचे अवैध धंदे करणाऱ्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे सर्व जनतेला माहित आहे.
तसेच नूतन पोलीस निरीक्षकांनी आपल्या कामाची सुरुवात ही स्वतःच्या पोलिस ठाण्यातून करावी.पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला आलेल्या लोकांना तासंतास बसावे लागते.इथं थांब…तिथं थांब… बाहेर जा.. परत ये… अशा प्रकारचे तक्रारदारांनाच पोलीस स्टेशनमध्ये नेहमीच सुनावले जाते, तक्रार नोंदवायला गेलेल्या तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे गुन्हा नोंदवून घेतला जात नाही, ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे तर आठ आठ.. पंधरा पंधरा दिवस घेतले सुद्धा जात नाहीत. उलट यामध्ये तक्रारदारालाच पोलिसांकडूनच दमदाटी केली जाते. हे थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तालुक्यातील प्रत्येक बीट मध्ये असणारे कर्मचारी हे अनेक दिवसापासून एकाच बिटला असल्यामुळे ते स्थानिक राजकीय दवाखाली येऊन काम पाहत आहेत. त्यामुळे गोरगरीब लोकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे सदरच्या कर्मचाऱ्यांची तात्काळ बीट बदल्या कराव्यात. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठे जन आंदोलन करण्यात येईल.असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे सांगोला तालुकाध्यक्ष विनोद उबाळे यांनी दिला आहे.