जि.प.प्रा.शाळा-चव्हाणवाडी व केसकरवस्ती शाळेत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

Updated On:
---Advertisement---

 

महूद, ता. ३ : महूद अंतर्गत असलेल्या चव्हाणवाडी-केसकरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.या शाळेच्या माजी विद्यार्थिनी वैष्णवी पंढरीनाथ साळुंखे व ज्ञानेश्वरी नवनाथ खबाले या विद्यार्थिनी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या आहेत. तसेच या प्राथमिक शाळेचा विद्यार्थी प्रणव प्रवीण नागणे याने मंथन सामान्य ज्ञान परीक्षा सन २०२५ तसेच स्पेक्ट्रम परीक्षा सन २०२५ या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे.तर इयत्ता दुसरी मधील दक्ष सोमनाथ घाडगे हा विद्यार्थी सांगली गुणवत्ता शोध चाचणी परीक्षेत तालुक्यात प्रथम आला आहे.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येथील सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना श्री.चव्हाण यांनी सांगितले की,वाडीवस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळते आहे.अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी विविध उपक्रम या शाळांमध्ये राबविले जात आहेत. अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये ही जिल्हा परिषदांच्या शाळा अग्रेसर ठरत आहेत. याच जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी राज्य व केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करत आहेत.

या कार्यक्रमास संजय चव्हाण,प्रकाश साळुंखे,नवनाथ खबाले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण नागणे,नवनाथ चव्हाण,माजी मुख्याध्यापक तानाजी खबाले,धुळा सातपुते,उमेश महाजन,वंदना पाटणे, विठ्ठल तांबवे,सोमनाथ घाडगे,माहेश्वरी घाडगे,सविता विभुते,अनुसया गोसावी यांचेसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक उमेश महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन  वंदना पाटणे यांनी केले.आभार विठ्ठल तांबवे यांनी मानले.

Follow Us On