महीम गावचे नितीन गोरे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधून पीएच.डी. पदवी बहाल.

Published On:
---Advertisement---

सांगोला/ प्रतिनिधी

महिम(ता.सांगोला) येथील नितीन तानाजी गोरे यांना वनस्पती शास्त्र विषयाशी संबंधित 

मटकीवर्गीय प्रजातींवर दुष्काळजन्य ताण व सहनशीलता या विषयावरील सखोल संशोधनाबद्दल कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट(पीएच.डी.)पदवी बहाल केली आहे.

डॉ.नितीन गोरे हे मूळचे सांगोला तालुक्यातील महिम गावचे असून अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे आले आहेत.सध्या ते सातारा येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. डॉ. नितीन गोरे यांना वनस्पतीशास्त्र विषयातून “Studies on Drought Stress Tolerance in Vigna Species of Section Aconitifoliae in India”

या विषयावरील संशोधनाकरिता शिवाजी विद्यापीठाने डॉक्टरेट (पीएच.डी.)पदवी दिली आहे.या संशोधनात त्यांनी भारतातील मटकीवर्गीय प्रजातींवर दुष्काळजन्य ताण व सहनशीलतेविषयी सखोल अभ्यास केला आहे.दुष्काळाच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन कृषी क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून,भविष्यात दुष्काळप्रवण भागात पिकांचे उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी मदत होणार असल्याचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एन. बी. गायकवाड यांनी सांगितले. नितीन गोरे यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. महेंद्र अहिरे यांनी काम पाहिले.डॉ. सुरज उमडाळे,डॉ.पंकज मुंदडा यांचेही विशेष सहकार्य लाभले. नितीन गोरे यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के,कुलसचिव डॉ. विजय कुंभार, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, सातारा चे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनी अभिनंदन केले आहे.

Follow Us On