चिकमहुद (ता.सांगोला) येथील व यशवंत विद्यालय, शिरभावी येथे कार्यरत असणारे सहशिक्षक श्री. नामदेव बिरा सातपुते यांना नुकताच सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळा कृती समिती मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्या.पंढरपूरयांचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने आज दि.५ रोजी गौरविण्यात आले आहे.सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळा कृती समिती मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्या. पंढरपूर च्या माध्यमातून चालू वर्षापासून शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने पुरस्काराचे आयोजन सिंहगड इन्स्टिट्यूट कोर्टी येथे केले होते . सदरचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार नामदेव बिरा सातपुते यांना शिक्षक आमदार मा. दत्तात्रेय सावंत सर, सिंहगड संस्थेचे संस्थापक संजय नवले, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य व प्राचार्य भाईगुडे सर, प्रमुख पाहुणे बाबर सर, सचिव घनश्याम शिंदे या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
नामदेव सातपुते सर हे चिकमहुद तालुका सांगोला येथील असून ते सध्या यशवंत हायस्कूल शिरभावी येथे कार्यरत असून उपक्रमशील व आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी माता पालक यांच्या सहकार्याने गुणवत्ता वाढीसाठी उल्लेखनीय काम करत आहेत.विविध स्पर्धा परीक्षा,विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा,क्रीडा स्पर्धा यामध्ये नामदेव सातपुते यांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तसेच शालेय व सहशालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत वृक्षारोपण,वृक्षसंवर्धनात नियमित योगदान दिले आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या कलेला वाव,त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवणे व शैक्षणिक उठाव ही प्रभावी कामे केली आहे .मुलांचे शिक्षण,आरोग्य व सक्षमीकरण यासाठी विविध उपक्रमात सहभाग यासह केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरी बद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.यावेळी यशवंत हायस्कूलचे प्राचार्य सूर्यकांत पवार सर, माननीय सुशील कुमार शिंदे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ दिघे सर, सहशिक्षक दयानंद राक्षे सर, उत्तम गळवे सर उत्तम सुरवसे सर, जनार्धन सावंत सर, धोंडीराम देशमुख सर, हनुमंत चव्हाण सर, बिराप्पा गरंडे सर, शेषनाथ इंगोले सर ,गणपत घाडगे, म्हाकू खांडेकर सर, महादेव सावंत, प्रभाकर पवार ,विजय फडतरे, परशुराम सातपुते, बालाजी सातपुते, आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदेव सातपुते सर यांना मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल त्यांचे राजर्षी शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, चिकमहूदचे संस्थापक मा.आमदार शहाजीबापू पाटील व संस्थेचे अध्यक्ष मा.सागर सुभाष पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले.