चिकमहुद /प्रतिनिधी
चिकमहुद (ता.सांगोला) येथील व यशवंत विद्यालय, शिरभावी येथे कार्यरत असणारे सहशिक्षक श्री. नामदेव बिरा सातपुते यांना नुकताच सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळा कृती समिती मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्या.पंढरपूर यांचे वतीने कृतीशील शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळा कृती समिती मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्या. पंढरपूर च्या माध्यमातून चालू वर्षापासून शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने पुरस्काराचे आयोजन केले आहे. सदरचा पुरस्कार हा नामदेव बिरा सातपुते यांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरी बद्दल कृतीशील शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.
सदरचा पुरस्कार वितरण कार्यक्रम हा सिंहगड कॉलेज, कोर्टी ता.पंढरपूर येथे वार सोमवार दिनांक ०५/०५/२०२५ रोजी सकाळी ११:०० वा. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.