अनकढाळ येथे महिलांसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Updated On:
---Advertisement---

सांगोलाः-अनकढाळ येथे महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आले. ग्रा. पं. १५ वित्त आयोग मधून महिला कौशल्य विकारा कार्यक्रम अंतर्गत हे प्रशिक्षण राबविण्यात आले. महिलांनी स्वतःच्या कौशल्यावर स्वतःचे कुटुंब चालविणे स्वतःची उपजीविका भागविणे, आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे व कुटुंब सक्षम बनविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

सदरचे प्रशिक्षण हे अनकढाळ ग्रामपंचायत व सांची बहुउद्देशीय सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून राबविण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैशाली बंडगर व ग्राम विकास अधिकारी सौ. वर्षाराणी पवार यांनी सदरच्या कार्यक्रमास सहकार्य केले. सांची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिवणकाम व बेसिक संगणक प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असेल. महिलांना याचा भविष्यात कसा फायदा होईल, याचे योग्य मार्गदर्शन केले. गावातील महिलांनी या कार्यक्रमासाठी उस्फूर्त प्रतिसाद दिला, प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमासाठी माजी सरपंच उतम पाटील, ज्येष्ठ नागरिक राजू बंडगर, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर बंडगर, ग्रामपंचायत सदस्य वैशाली बंडगर, ग्रामपंचायत सदस्य शास्दा काटे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना बंडगर, ग्रामसंघ अध्यक्ष स्वाती युवराज बंडगर, ग्रागरांघ सचिव सीमा गणेश बंडगर, युवा नेते, स्वी बंडगर, विजय बंडगर, विक्रारा बंडगर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ट्रेनर सौ. पंचशीला वाघमारे मॅडम, नवघरे सर यांनी उत्तम प्रशिक्षण दिले

कार्यक्रमाची रूपरेषा ग्रामविकास अधिकारी यांनी दिली. महिलांनी मनोगतात प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले, आणि अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविल्यास महिलांना प्रेरणा मिळेल असे मत मांडले. उमेद अभियानाच्या सीआरपी सौ. अर्चना बंडगर यांचे यासाठी विशेष सहकार्य लागले. आभार प्रदर्शन करून, प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

Follow Us On